माझे काका आणि वडीलही इंग्रजी शाळेत शिकले - राज ठाकरे

आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवल्याचं समर्थन केलं आहे.

Updated: Mar 1, 2016, 09:47 PM IST
माझे काका आणि वडीलही इंग्रजी शाळेत शिकले - राज ठाकरे title=

पुणे : मराठी भाषेला प्रोत्साहन देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवल्याचं समर्थन केलं आहे. 

या मुद्यावरील आरोपांना उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, माझे काका बाळासाहेब ठाकरे आणि वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले. ते दोनही जण ओरिएंटल स्कूलचे विद्यार्थी होते.

राज यावर बोलतांना म्हणाले, मी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवलं असलं, तरी संस्कार मराठीत केले आहेत. राज ठाकरे मटाने आयोजित केलेल्या मटा मैफलमध्ये बोलत होते, हा कार्यक्रम पुण्यात पार पडला.