राज ठाकरेंनी पुन्हा उचलला परप्रांतियांचा मुद्दा

दिव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत पुन्हा एकदा परप्रांतिय लोकांचा मुद्दा उचलला आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतियांची संख्या वाढली आहे. मुख्यमंत्री जुहूवर जाऊन हिंदीत बोलतात. ते फक्त परप्रांतियांच्या मतांवर डोळा ठेवून अशी टीका देखील राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली. भाजपचा परप्रांतियांच्या मतांवर डोळा असल्याचं त्यांनी म्हटलं.

Updated: Feb 15, 2017, 08:20 PM IST
राज ठाकरेंनी पुन्हा उचलला परप्रांतियांचा मुद्दा title=

ठाणे : दिव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत पुन्हा एकदा परप्रांतिय लोकांचा मुद्दा उचलला आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतियांची संख्या वाढली आहे. मुख्यमंत्री जुहूवर जाऊन हिंदीत बोलतात. ते फक्त परप्रांतियांच्या मतांवर डोळा ठेवून अशी टीका देखील राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली. भाजपचा परप्रांतियांच्या मतांवर डोळा असल्याचं त्यांनी म्हटलं.

पैशे घेऊन आपल्याच लोकांनी परप्रांतियांना थारा दिला. असा आरोप देखील राज यांनी केला. ठाणे जिल्हा हा भारतातला एकमेव जिल्हा आहे ज्याची लोकसंख्या वेगाने वाढते आहे ते बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळें. लोकसंख्या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे वाढल्यामुळे महापालिका तयार झाल्या.