गुहागर समुद्र किनारी कासवाच्या २०९ पिल्लांना जीवनदान

 गुहागर समुद्र किनारी कासवाच्या २०९ पिल्लांना जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.

Updated: Mar 12, 2016, 03:27 PM IST
गुहागर समुद्र किनारी कासवाच्या २०९ पिल्लांना जीवनदान title=

रत्नागिरी : गुहागर समुद्र किनारी कासवाच्या २०९ पिल्लांना जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.

गुहागरच्या वनविभागाला गुहागर समुद्र किनारी ६८० अंडी सापडली होती. ही अंडी वनविभागाने संरक्षित करुन ठेवली. ऑलिव्ह रेडली जातीच्या जगात दुर्मिळ झालेल्या कासवांची पिल्ले संरक्षित केलेल्या घरट्यांमधून बाहेर येत आहेत.

ऑलिव्ह रेडली जातीची ही मोठ्या आकाराची कासव खास अंडी घालण्यासाठी सुरक्षित किनारे शोधत कोकणच्या किनाऱ्यावर येतात. याच दुर्मिळ कासवांचे जतन करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी कासव बचाव मोहीम सुरु आहे. यासाठी काही सामाजिक संस्था आणि प्राणी प्रेमी त्यासाठी पुढे येत आहेत.