रेशनिंग घोटाळा : आरोपींवर मोक्का, मालमत्ता जप्तींची कारवाई

(योगेश खरे, झी २४ तास ) राज्यात गाजलेल्या रेशन घोटाळ्यातले आरोपी घोरपडे बंधू अखेर पोलिसांना काल शरण आले. याआरोपींसह ४ आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Updated: Nov 30, 2015, 09:50 PM IST
रेशनिंग घोटाळा : आरोपींवर मोक्का, मालमत्ता जप्तींची कारवाई title=

नाशिक : (योगेश खरे, झी २४ तास ) राज्यात गाजलेल्या रेशन घोटाळ्यातले आरोपी घोरपडे बंधू अखेर पोलिसांना काल शरण आले. याआरोपींसह ४ आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

आरोपींची १७० कोटींची संपत्ती मोक्का अंतर्गत जप्त करण्याची धडक कारवाई जिल्हा प्रशासनाने केली होती.  रेशन घोटाळ्यातल्या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यात एकूण पाच जणांना अटक करण्यात आलीय. या घोटाळ्यात पहिला गुन्हा १ जून २०१५ ला मोक्का अंतर्गत दाखल करण्यात आला.   

सिन्नर येथील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलसांनी हा ट्रक पकडलं होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मदन पवार, रमेश पाटणकर या पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

सुरगाणा येथे झालेल्या घोटाळ्यात शासकीय अधिकारी आणि गुन्हेगारांचे संगनमत आढळून आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.