Controversy of Manusmriti movement in Mahad : महाड आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती (Manusmriti movement) असं लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महाड येथील संदेश साळवी यांनी आव्हाडांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीये...जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये. तर, आचारसंहिता सुरू असताना विनापरवाना आंदोलन केल्याचाही आरोप आव्हाडांविरोधात करण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणीही आव्हाडांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल होणार असल्याचे बोलले जात होते. अखेर आव्हाड यांच्याविरोधता गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला आहे. भादवि कलम 153 153 अ 295 504 व 505 अन्वये कलमा नुसार कारवाई
जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. बाबासाहेबांचा फोटो मुद्दामून फाडलेला नाही, अनावधाने चूक घडली...मात्र, कुणाच्या भावना दुखावल्यास नतमस्तक होऊन माफी मागतो असं आव्हाडांनी म्हटलंय...बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा आव्हाडांवर गंभीर आरोप करण्यात आलाय...त्याप्रकरणी आव्हाडांनी माफी मागितलीय.
राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केलाय. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केलाय. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मिटकरींनी केलीय. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं आंदोलन केलंय. महापुरुषांचा फोटो फाडल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन केलंय. आव्हाडांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसतानाही चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचं दहन केलंय. यावेळी आव्हाडांनी मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यास विरोध केलाय...महाडसह रायगडमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. तरीदेखील आव्हाडांनी महाडमध्ये आंदोलन मनुस्मृतीचं दहन केलं. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
47/2(21.3 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.