आत्मक्लेशानंतर बदल घडेल?

एरव्ही आपल्या टगेगिरीची जाहीर कबुली देणा-या अजितदादांमध्ये या आत्मक्लेशानंतर खरंच बदल घडेल का याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 14, 2013, 08:21 PM IST

www.24taas.com, महाराष्ट्र
अजित पवारांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर आत्मक्लेश आंदोलन करुन असभ्य आणि वादग्रस्त वक्तव्याबद्दल प्रायश्चित्त घेतलं. एरव्ही आपल्या टगेगिरीची जाहीर कबुली देणा-या अजितदादांमध्ये या आत्मक्लेशानंतर खरंच बदल घडेल का याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.
अजितदादांना फार नव्यानं सुरुवात करावी लागेल, एका दिवसाच्या आत्मक्लेशनं विश्वास बसणार नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी दिली. बाबा आढाव यांनी ‘अजितदादांच्या आत्मक्लेशाची टिंगल नको, उपरती झाली ही चांगली गोष्ट आहे’ अशा शब्दांत आपलं मत व्यक्त केलं. तर `सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को`, अशा शब्दात विश्वंबर चौधरी यांनी अजितदादांना टोला लगावलाय.

यशवंतराव चव्हाण यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबुद्धी सुचेल, अशी अपेक्षा गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांनी आत्मक्लेश करण्यापेक्षा राजीनामा द्यावा, दुष्काळग्रस्त भागात दौरा करावा, असा सल्ला विनोद तावडेंनी दिला आहे. अजितदादांनी यशवंतराव चव्हाणांना ओलीस धरू नये. त्यांचं चरित्र वाचलं असतं, तर आज ही वेळच आली नसती, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे...