सांगली : जिल्ह्यात आष्टा इथे कोल्हाटी समाजाच्या पंचांनी तालिबानी अत्याचार सुरू केलेत. दारूड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करण्यास नकार देणा-या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं. सर्वात धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईवर बलात्काराचाही प्रयत्न झाला.
पीडीत महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हाटी समाजाच्या जात पंचायतीचा प्रमुख दिलीप जावळेसह पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दिलीप जावळे याच्यावर महिलेशी गैरवर्तन करणे आणि त्याच्यासह अन्य पंधरा जणांवर खंडणी , मारहाण , दहशत माजवणे , शिवीगाळ करणे या सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मरणासन्न असलेल्या किरण जावळे या व्यक्तीसोबत एका लहान मुलीचं लग्न करण्याचं फर्मान जावळेनं काढलं.. मात्र मुलीच्या आईने या प्रकाराला नकार दिला. त्यावर २० हजार रूपये खंडणी जात पंचायतीने या महिलेकडे मागितली. तसंच जावळेने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. जावळेसह पंधरा जणांनी या महिलेला मारहाण केलीय. मात्र महिलेनं या नराधमांच्या ताब्यातून स्वसःची सुटका करून घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.