सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

 सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात इसमाने फोनवरुन शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Dec 20, 2014, 03:10 PM IST
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी title=

नागपूर :  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात इसमाने फोनवरुन शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

सध्या, एकनाथ शिंदे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहेत. काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांना एक फोन आला. अनोळखी नंबरवरून आलेला फोन त्यांनी उचलताच, पलीकडच्या व्यक्तीनं त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. या व्यक्तीनं आपली कोणतीही ओळख सांगितली नाही. त्यानंतर शिंदे यांनी तातडी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या कानावर ही गोष्ट घातली.

दरम्यान, पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ केली. यासंदर्भात पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.