सलमान खान प्रकरणी रवींद्रला न्याय नाही : कुटुंबीय

 सलमान हिट एँड रन प्रकरणात सलमान खानला जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने पुढील निकाल लवकरात लवकर लावावा, अशी अपेक्षा या केसमधील फिर्यादी रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.  

Updated: May 9, 2015, 08:33 AM IST
सलमान खान प्रकरणी रवींद्रला न्याय नाही : कुटुंबीय title=

जळगाव : सलमान हिट एँड रन प्रकरणात सलमान खानला जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने पुढील निकाल लवकरात लवकर लावावा, अशी अपेक्षा या केसमधील फिर्यादी रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.  

अपघातातील पिडीताना न्यायालयीन व्यवस्थेप्रमाणे न्याय मिळेल. मात्र या प्रकरणातील दबावाला बळी पडलेल्या आणि सत्याची बाजू उचलून धरणाऱ्या मयत रवींद्र पाटील यांना न्याय मिळाला नसल्याची खंत त्याच्या परिवाराने व्यक्त केली आहे. अपघात प्रकरणात दबावामुळे रवींद्र पाटीलची मानसिक  स्थिती ढासळल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी पहिल्यांदा केला आहे.

'हिट अॅन्ड रन' प्रकरणी सलमान खानला सेशन्स कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टानं आता स्थगिती दिलीय. शिवाय सलमान खानला जामीनही मंजूर  झालाय.

तब्बल १३ वर्षांनी हिट अँड रन प्रकरणाचा निकाल लागला. ६ मे रोजी सलमान खानला मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली. आणि अवघ्या चार तासात मुंबई हायकोर्टानं अंतरिम जामीन देखील दिला. शुक्रवारचा दिवसही सलमानसाठी लकी ठरला.

मुंबई हायकोर्टानं ३० हजाराच्या जातमुचलक्यावर सलमानला जामीन मंजूर केला. एवढंच नाही तर त्याच्या शिक्षेला हायकोर्टानं स्थगितीही दिली. त्यामुळं सलमानची जेलवारी तूर्तास टळलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.