सातारा : शहरात जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तीन व्यक्तींना बॉम्बे रेस्टॅारंट चौकात अटक करण्यात आली.
पहाटे २ वाजता ६० लाखांच्या नवीन २००० च्या नोटांसह सातारा पोलिसांनी तिघांना अटक केली. एवढी रक्कम आली कोठून याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. सातारा गुन्हे अन्वेशन विभागाने ही कारवाई केली आहे.
रोख रकमेसह होंडा सिटी गाडी पोलिसानी ताब्यात घेतली. एवढी मोठी रक्कम नक्की कोणाची आहे आणि ती कोठून आणली याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील तपास करत आहेत.