प्रचार चुकीचा, पाडापाडीत रस नाही : शरद पवार

सरकार पाडण्याचा प्रचार चुकीचा आहे, आपल्याला पाडापाडीत रस नाही, तसेच अस्थिरता माजवण्याचाही आपला उद्देश नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

Updated: Nov 19, 2014, 02:54 PM IST
प्रचार चुकीचा, पाडापाडीत रस नाही : शरद पवार title=

अलीबाग : सरकार पाडण्याचा प्रचार चुकीचा आहे, आपल्याला पाडापाडीत रस नाही, तसेच अस्थिरता माजवण्याचाही आपला उद्देश नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

मग रस्त्यावर उतरू
मात्र जनविरोधी कामं केल्यास आपण रस्त्यावर उतरू असंही शरद पवारांनी अलीबागमधील राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात बोलतांना म्हटलं आहे.

दुष्काळात मदत करा
दुष्काळाचा तडाखा मराठवाड्यासाह राज्याच्या काही भागात आणखी वाढणार आहे, राष्ट्रवादीला रस्त्यावर उतरून लोकांची मदत करावी लागेल, असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

मोदींच्या सभा आणि अपयश
महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या, त्या ठिकाणी भाजपला  १०० टक्के यश मिळालेलं नसल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं.

तरीही कामं सुरूच राहणार
निवडणुकीत कामाचं फळ मिळेल यावर विश्वास राहिलेला नाही, तरीही विकास कामं सुरूच ठेवा, असंही शरद पवार यांनी म्हटलंय, तसेच पक्षात सुसंवाद वाढवण्याची गरज असल्याचं पवारांनी सांगितलं.

सोशल मीडियाकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज- पवार
सोशल मीडियाकडे लक्ष केंद्रीत करा, तुमची अकाऊंट नसतील तर उघडून घ्या, आपल्या कामाबद्दल चर्चा करा, अशी सूचना राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

सुरूवातीला मला वाटत होतं सोशल मीडिया हा आपला विषय नाही, पण हे सर्व आता शिकून घेतलं पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.