मनसे चालेल, पण भाजपला बाहेर ठेवा - शिवसैनिक

Updated: Nov 2, 2015, 04:48 PM IST
मनसे चालेल, पण भाजपला बाहेर ठेवा - शिवसैनिक  title=

 

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला यश मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी विजयाचा जल्लोष केला आहे. 

केडीएमसी हा तर ट्रेलर आहे, मुंबई-ठाणेचा पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात शिवसैनिकांनी केडीएमसी विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. 

केडीएमसीमध्ये एकवेळ मनसेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करा, पण भाजपला सत्तेबाहेर ठेवा अशी भूमिका मनसैनिकांनी घेतली आहे. 

पण या संदर्भातील अंतीम निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतली असेही शिवसैनिकांनी सांगितले आहे. 

उद्धव ठाकरे मातोश्रीवरच 

शिवसेनेनेला 63 जागांची आघाडी होती पण ती 52 पर्यंत कमी झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीचा दौरा रद्द केला. सध्या तरी ते मातोश्रीवर आहे. 

उद्धव यांच्या ऐवजी खासदार अनिल देसाई, आदेश बांदेकर कल्याण डोंबिवलीकड़े रवाना झाले आहेत.  मातोश्री बाहेर कला नगर प्रवेश द्वारावरचा शिवसैनिकांचा  ढोल-ताशाचा जल्लोष पॅकअप झाला. 

आता सेनेची सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.