पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध शिवसेना पुन्हा आक्रमक

पुण्यात २५ एप्रिलला पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलीय. 

Updated: Apr 20, 2015, 11:14 PM IST
पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध शिवसेना पुन्हा आक्रमक title=

पुणे: पुण्यात २५ एप्रिलला पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलीय. 

पाकिस्तानी कलाकार आतिफ अस्लम याच्या गाण्याचा कार्यक्रम अमानोरा पार्कमध्ये होणार आहे. अंजनेय साठे ग्रुप आणि एक्सटसी बिझनेस सोल्युशन्सतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.  

भारतात दहशतवादी कारवाया करून अस्थिरता निर्माण करणाऱ्या पाकिस्तानातील कलाकाराचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी चित्रपट सेनेनं केलीय. कार्यक्रम रद्द न केल्यास तो उधळून लावला जाईल, असा इशारा सेनेतर्फे देण्यात आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.