ठाणे : बदलपुरात शिवसेना उपशाखाप्रमुख अणि रिक्षा चालक केशव मोहिते यांची सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने बदलापुरात खळबळ उडाली आहे. दरम्यान हत्येच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्यात.
केशव मोहिते यांची हत्या राजकीय वादातून झाली असल्याचा नातेवाईकांईनी आरोप केला आहे. त्यामुळे शहरात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे . हत्येच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आज सकाळी सात वाजताच्या सुमारास केशव मोहिते हे बदलापूर स्टेशनवरून प्रवासी भाडे घेऊन खरवाई एमआयडीसी या ठिकाणी गेले होते. त्याचवेळी रिक्षात प्रवासी म्हणून असलेल्या तिघांनी तीक्ष्ण हत्यारांनी त्यांच्या हातापायावर वार केलेत. यात केशव गंभीर जखमी झालेत. केशव यांना उपचरार्थ डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्यांचे निधन झाले.
आम्ही सर्व अंगानी हत्येचा तापस करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरतील रिक्षा चलकांनी रिक्षा बंद केल्या आहेत .बदलापुरात २२ एप्रिल रोजी पालिकेच्या निवडणूक असल्याने या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. बदलापुरात काही महिन्यांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख मोहन राऊत यांची हत्या झाली होती. त्यामुळे आता बदलापूर शहरात या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.