उल्हासनगर : उल्हासनगर पोलिसांनी एक सेक्स रॅकेट प्रकरणात शिवसेनेच्या एका महिला नेत्याला अटक करण्यात आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.
उल्हासनगर कॅम्प १ मध्ये शिवसेनेची महिला संघटक म्हणून काम करणाऱ्या शोभा गमलाडू हिला पोलिसांनी अटक केलीय. सेक्स रॅकेट प्रकरणात पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी दुर्गा पॅलेस नावाच्या लॉजवर छापा मारला. इथंच शोभा गमलाडू हिला ताब्यात घेण्यात आलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीनंतर या महिलेला शिवसेनेनं पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं, असं समजतंय. तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी मात्र, कुणीही येऊन आपल्यासोबत फोटो काढतात, म्हणून ते काही पक्षाचे कार्यकर्ते होत नाहीत, असं म्हणत या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केलाय.