महाड : महाड एमायडीसी येथील मुंबई गोवा महामार्गावरील श्री ऑटो या मारूती सर्व्हीस सेंटरला सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशामन दलाला यश आलेले नाही. महाड नांगलवाडी फाट्याजवळील ही घटना घडली. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर ज्वाळा आणि धुरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
या आगीत कंपनीच्या मुख्य कार्यालय, स्टोअररूमला आग लागल्याने आगीची तीव्रता वाढत गेली. एमआयडीसी आणि महाड नगरपालिकेच्या अग्निशमन टॅंकरने आग आटोक्यात प्रयत्न केला गेला. आगीत लाखो रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
या कंपनीत अलिकडेट सुमारे २० लाख रूपये किंमतीचे मशीन बसविण्यात आले होते. या आगीत या मशीचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीतील दुरूस्तीला आलेल्या अन्य वाहने वाचविण्यात ग्रामस्थांना येश आले. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केलेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.