सायन-पनवेल महामार्ग सुस्साट

दहा पदरी रुंद करण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.नवी मुंबई, पनवेल, पुणे, गोवा आणि कोकणात जाण्यासाठी हा रस्ता फायदेशीर ठरत आहे.

Updated: Jul 2, 2014, 10:46 AM IST
सायन-पनवेल महामार्ग सुस्साट title=

नवी मुंबई : दहा पदरी रुंद करण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.नवी मुंबई, पनवेल, पुणे, गोवा आणि कोकणात जाण्यासाठी हा रस्ता फायदेशीर ठरत आहे.

पनवेल, पुणे आणि गोव्याला जाण्यासाठी सायन - पनवेल महामार्ग हा मुख्य मार्ग आहे. याआधी याच मार्गावरून प्रवास करताना एक ते दीड तास लागायचे, आता मात्र ३० ते ३५ मिनटात हा मार्ग कापता येणार आहे.

या मार्गावर मानखुर्द, सानपाडा, शिरवणे, नेरूळ, सीबीडी आणि कळंबोली येथे उड्डाणपूल बांधले आहेत. त्यामुळे या महामार्गावरील प्रवास हा सुसाट असणार आहे. त्याचप्रमाणे उरण जेएनपीटीकडे जाणारी जड वाहतूक देखील सुखकर होईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.