पनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकाची हत्या

एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. 

Updated: Jul 1, 2014, 09:18 PM IST
पनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकाची हत्या title=

नवी मुंबई : एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. 

पनवेल येथील खीडूकपाडा येथे राहणाऱ्या शकुंतला भोईर या ६५ वर्षाच्या वृद्धेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची हत्या करण्यात आली आहे. 

पनवेल येथील खीडूकपाडा येथे शकुंतला भोईर या वयोवृद्ध महिला एकटी रहात होती. 

रात्री या महिलेची डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली चोरीच्या उद्देशाने ही हत्या झालायचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. 

एकट्या राहणाऱ्या या महिलेची हत्या ओळखीच्या व्यक्तींनी केली असावी, याबाबत पोलीसांनी आपला शोध सुरु केला आहे.

या हत्येने पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे, 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.