भंडारा जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं.

Updated: Dec 18, 2016, 06:52 PM IST
भंडारा जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद title=

भंडारा : जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यामध्ये भंडारा, पवनी, साकोली आणि तुमसर या नगरपरिषदेचा समावेश आहे.

मतदानाला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर या निवडणुकीत नगरपरिषद क्षेत्रातील कामगारांना २ तासाची विशेष सवलत देण्यात आली होती. उमेदवारांचं भवितव्य मतदारांनी मतदान यंत्रात बंद केलं आहे त्यामुळे आता कोणाला सत्ता मिळणार हे पाहणं उत्सूकतेचं ठरणार आहे.