सांगली : सांगलीत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीच्या इंजिन मध्ये साप शिरला आणि वाहन चालकाची भंबेरी उडाली आणि चालकाने भीतीने गाडीचं सोडली.
30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताची ही घटना आहे. सांगलीच्या तात्यासाहेब मळ्याच्या रस्त्यावरून एक महिला आणि पुरुष दुचाकीवरून जात होते. त्यावेळी ही घटना घडली.
अखेर सर्पमित्र अनिल माने यांना बोलावण्यात आले. त्यांनी धाडसाने गाडी खोलून इंजिनमध्ये बसलेला साप बाहेर काढला आणि सर्वांनी सुस्कारा सोडला.