मुंबई : राज्यामधला तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुढचे दोन दिवसही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, विदर्भ आणि मराठवाड्याचं तापमान पुढचे दोन दिवस जास्त असेल.
मुंबईचं आजचं तापमान सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसनं जास्त होतं. मुंबईत आज कमाल तापमान ३८.४ होतं. राज्यातलं सर्वाधिक तापमान जळगाव, नांदेड आणि डोंबिवलीमध्ये नोंदवलं गेलं. या शहरांचं आजचं तापमान ४२ अंश सेल्सिअस होतं.
नागपूर -४०
पुणे - ३९.७
औरंगाबाद - ४०.५
सोलापूर - ४१.३
नाशिक - ४०.३
कोल्हापूर - ३९.२
अमरावती - ४०.८
रत्नागिरी - ३२.६