ठाणे दुहेरी हत्याकांडचा छडा उलगडला, दोघांना अटक

येथील ब्रम्हांड येथील रिजन्सी हाईट्स या उच्चभ्रू वस्तीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी ३६ तासांत मारेक-यांना अटक केली. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या जबानीवरुन ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या केअरटेकरच्या खुन्यांपर्यंत पोहोचण्यात पोलीसांना यश आलंय.

Updated: Jun 3, 2016, 09:21 AM IST
ठाणे दुहेरी हत्याकांडचा छडा उलगडला, दोघांना अटक title=

ठाणे : येथील ब्रम्हांड येथील रिजन्सी हाईट्स या उच्चभ्रू वस्तीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी ३६ तासांत मारेक-यांना अटक केली. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या जबानीवरुन ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या केअरटेकरच्या खुन्यांपर्यंत पोहोचण्यात पोलीसांना यश आलंय.

 या प्रकरणी पोलिसांनी मृत ज्येष्ठ नागरीचा जुना केअर टेकर प्रशांत पवार आणि त्याचा साथिदार आशिष यादवला अटक केली. नोकरी गेल्याचा बदला घेण्यासाठी आणि घरात चोरी करण्याच्या उद्देशानं या दोघांनी ज्येष्ठ नागरिकांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

प्रशांत पवार हा सीताराम श्रॉफ यांचा केअर टेकर म्हणून काम करत होता मात्र तो दांड्या मारत असल्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं. याचा बदला घेण्यासाठी प्रशांतनं मित्राच्या मदतीनं सीताराम श्रॉफ आणि त्यांचा केअर टेकर संतोष लवंगारे याचा खून केला.

त्यानंतर घरातील ३० ते ३५ हजारांची रोकड, मोबाईल, आयपॉड चोरुन पळ काढला. याप्रकरणी श्रॉफ यांची नात ऋतिका हिच्या तक्रारीनंतर कासारवडवली पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज पाहून इमारतीच्या सुरक्षारक्षकाची जबानी घेतली आणि या दुकलीचा छडा लावला.