महापौरांना बिअरचे टीन पाठवून राष्ट्रवादीचं आंदोलन

ठाणे महानगरपालिकेत महापौरांच्या दालनात विरोधकांनी बियरचे कॅन ठेऊन अनोखं आंदोलन केलं. परवाने रद्द केलेल्या बारमालकांना पुन्हा परवाने दिल्यामुळं संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापौर संजय मोरे यांच्यासाठी हे टीन आणले होते. मात्र महापौर न भेटल्यानं हे टीन तिथंच टाकून राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलंय. 

Updated: Jan 5, 2015, 05:12 PM IST
महापौरांना बिअरचे टीन पाठवून राष्ट्रवादीचं आंदोलन title=

ठाणे: ठाणे महानगरपालिकेत महापौरांच्या दालनात विरोधकांनी बियरचे कॅन ठेऊन अनोखं आंदोलन केलं. परवाने रद्द केलेल्या बारमालकांना पुन्हा परवाने दिल्यामुळं संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापौर संजय मोरे यांच्यासाठी हे टीन आणले होते. मात्र महापौर न भेटल्यानं हे टीन तिथंच टाकून राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलंय. 

काही दिवसांपूर्वीच परवाने रद्द केलेल्या बारमालकांनी 31 डिसेंबरच्या परवानगीसाठी महापौरांची भेट घेतली. त्यातले काहीजण लेडीज बारचे मालक असल्याचा आरोप विरोधकांनी महासभेत केला. शहराच्या समस्यांकडे लक्ष न देता बारमालकांशी बैठक घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. 

त्यानंतर काही बारमालकांना अभय योजनेअंतर्गत परवाने देण्याचा निर्णय महापौरांनी घेतला होता. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बिअर टीनचं अनोखं आंदोलन केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.