नवी दिल्ली : जळगावातील घरकूल घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना आपल्या जळगाव तसेच शेजारील धुळे जिल्ह्यात न जाण्याच्या अटीवर हा जामीन देण्यात आला आहे. पुण्यात राहून कमिश्नर कार्यालयाला हजेरी लावण्याची सक्ती गुलाबराव देवकर यांना करण्यात आली आहे.
जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकर यांना दिलासा मिळाला असला, तरी माजी गृहनिर्माण मंत्री आणि जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीचे आमदार होते, त्यांनी कृषी आणि परिवहन राज्यमंत्रीपद देखिल भूषवलं होतं, या विधानसभेची निवडणूक त्यांनी तुरूंगातून लढवली होती, त्यांचा शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी पराभव केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.