ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदाराच्या घरात घबाड!

ठाणे पोलिसातील एक हवालदार कोट्यधीश असल्याचं समोर आलंय. प्रेमसिंग राजपूत असं नाव असलेल्या या हवालदाराचा पगार दरमहा वीस हजार रुपये इतका आहे.

Updated: Feb 1, 2015, 03:47 PM IST
ठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदाराच्या घरात घबाड!  title=

ठाणे: ठाणे पोलिसातील एक हवालदार कोट्यधीश असल्याचं समोर आलंय. प्रेमसिंग राजपूत असं नाव असलेल्या या हवालदाराचा पगार दरमहा वीस हजार रुपये इतका आहे.

अवघा २० हजार रुपये पगार असतांना त्यांच्याकडे सोळा लाखांची रोकड, तीन घरं, एक गाळा, राजपूतच्या पत्नीच्या नावे एक इनोव्हा कार, भावाच्या नावे कार आणि मोटरसायकल असं घबाड सापडलंय.
 
वाड्यात एका लाचखोरी प्रकरणात राजपूतसह अन्य तिघांना अटक करण्यात आली होती. या चौकशी दरम्यान या हवालदाराकडे कोट्यवधी संपत्ती असल्याचं उघड झालंय. दरम्यान राजपूतच्या बँक खात्याचा तपास सुरु आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.