पुणे : पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन विभागाचे प्रमुख आणि विचारवंत प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांचे आज शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
डॉ. सुमंत गेल्या चार महिन्यांपासून आजारी होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत.
डॉ. सुमंत यांना रुग्णालयात दाखल करत असतानाच हृदयाचे कार्य बंद झाले. तातडीने उपचार करून त्यांच्या हृदयाचे कार्य सुरू करण्यात आले. त्याचवेळी मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला, अशी माहिती डॉ. समीर जोग यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.