राज्यात किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत, आज निकाल

राज्यातील काही महानगर पालिका आणि ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. कडक उन्हामुळे मतदानला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, काही ठिकाणी चांगले मतदान झाले.  बदलापूर ५६, अंबरनाथ ४८, नवी मुंबई ५०, औरंगाबाद ६०, वरणगाव-जळगाव ७८ टक्के, भोकरमध्ये ७४, राजूरमध्ये ७५.८ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण एक तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील, अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Updated: Apr 23, 2015, 12:03 AM IST
राज्यात किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत, आज निकाल title=

मुंबई : राज्यातील काही महानगर पालिका आणि ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. कडक उन्हामुळे मतदानला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, काही ठिकाणी चांगले मतदान झाले.  बदलापूर ५६, अंबरनाथ ४८, नवी मुंबई ५०, औरंगाबाद ६०, वरणगाव-जळगाव ७८ टक्के, भोकरमध्ये ७४, राजूरमध्ये ७५.८ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण एक तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील, अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीत किरकोळ वादावरून एमआयएम आणि कांग्रेसचे कार्यकर्ते अपापसात भिडले. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना गणेश कॉलोनी भागात घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत आज शांततेत मतदान झाले. शिवसेना व भाजपची राज्यात आणि देशात सत्ता असताना राजगुरुनगर मधे मात्र हे दोनी पक्ष एकमेका विरोधात निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मोठी उत्सुक्ता आहे. १८ जागांसाठी ८१ उमेदवार या निवडणुकीत आपल नशीब आजमावत आहेत.  

नांदेड जिल्ह्यातील भोकर नगर परिषदेसाठी आज सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली आहे. १९ जागांसाठी मतदान होत असलेल्या भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण ८० उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप हे पक्षही याठिकाणी पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. ही नगरपरिषद सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे अनेक मोहरे भाजपात गेलेले असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खा.अशोक चव्हाण ही नगर परिषद स्वत: च्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवितात कि विरोधक ही नगर परिषद त्यांच्याकडून हिसकावून घेतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कसोटी लागणार आहे.  एकूण जागा १९ जागांसाठी मुख्य लढत भाजप विरूद्ध शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस यांच्यात होत आहे. राजगुरूनगर नगरपालिकेत एकूण जागा १८ जागांसाठी मुख्य लढत शिवसेना विरुद्ध  भाजप यांच्यात आहे. तर मुंबई जवळील अंबरनाथ नगरपालिकेत एकूण जागा ५७ जागांत मुख्य लढत होत आहे. भाजप विरुद्ध  शिवसेना यांच्यात चुरस आहे.

कुळगाव- बदलापूर नगरपालिकेसाठी एकूण जागा ४७ जागांसाठी मुख्य लढत होत असून भाजप विरुद्ध  शिवसेना यांच्यात लढत होत आहे. तर वरणगाव (जळगाव) एकूण जागा १८ जागांसाठी मुख्य लढत होत आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे.

वाडी, मोवाड नगरपरिषद निवडणुकीसाठी १६६ उमेदवार रिंगणात आहेत. तर मोवाड नगरपालिकेसाठी ६६ उमेदवार आपले भवितव्य अजमावित आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक

कोकण विभाग

- पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
– ५७५ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका
– ३०६ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका

नाशिक विभाग

- जळगाव आणि अहमदनगर
– २७७ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका
– ७६ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका

पुणे विभाग

- सोलापूर
– १२७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका
– ७९ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका

औरंगाबाद विभाग

- औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, हिंगोली
– ६२० ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका
– १८४ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका

अमरावती विभाग

- अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा
– १४४४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका
– २०७ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका

नागपूर विभाग

- नागपूर, गडचिरोली
– चंद्रपूरमध्ये एका ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक
– ५२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.