देशातील परिस्थिती पाहता असहिष्णुता हा शब्द अपुरा : अरुंधती रॉय

देशातील सध्याच्या वातावरणाचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा असल्याची टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी केली आहे. 

Updated: Nov 28, 2015, 09:59 PM IST
देशातील परिस्थिती पाहता असहिष्णुता हा शब्द अपुरा : अरुंधती रॉय  title=

 पुणे : देशातील सध्याच्या वातावरणाचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा असल्याची टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी केली आहे. 

पुण्यातील महात्मा फुले समता पुरस्कारानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

दरम्यान, अरुंधती रॉय यांनी केलेल्या भाषणाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.