बुलढाणा जिल्ह्यात अनोखा ट्रॅक्टर पोळा

पोळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सजलेले नटलेले बैल. परंतु आधुनिकतेच्या या युगात अनेक शेतकऱ्यांकडील बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एक आगळावेगळा ट्रॅक्टर पोळा साजरा केला आहे. 

Updated: Sep 1, 2016, 09:07 PM IST
बुलढाणा जिल्ह्यात अनोखा ट्रॅक्टर पोळा title=

बुलढाणा : पोळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सजलेले नटलेले बैल. परंतु आधुनिकतेच्या या युगात अनेक शेतकऱ्यांकडील बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एक आगळावेगळा ट्रॅक्टर पोळा साजरा केला आहे. 

बळीराजाच्या शेतामध्ये वर्षभर राब राब राबणाऱ्या वृषभ राजाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी दरवर्षी बळीराजा पोळा हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांना धुवून त्यांना सजविल्या, नटवले जाते. त्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना गोडधोडाचा नैवद्य दिला जातो. परंतु आधुनिकतेच्या युगात बैलाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. 

बैलांची जागा ट्रॅक्टर सारख्या मशीनरी घेत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनकडे आता बैलच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे पोळ्याला कोणाची पूजा करावी असा प्रश्न बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील काही युवकांना पडला. 

आपल्याकडे असलेल्या ट्रॅक्टरचा अनोखा पोळा साजरा करण्याचा निर्णय युवकांनी घेतला. गावातील सर्व ट्रॅक्टर मालकांना एकत्र करून ट्रॅक्टरचा अनोखा पोळा त्यांनी भरावला. बैल पोळ्या प्रमाणे तोरण बांधून ट्रॅक्टरला सजवून ट्रॅक्टरची गावातून मिरवणूक काढण्यात आली. 

आधुनिक युगात बैलांची जागा ट्रॅक्टर सारख्या मशनरींनी घेतली आहे. ही बाब जेव्हढी चांगली आहे तेव्हढीच पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक देखील आहे. दिवसेंदिवस गोधनाची घटती संख्या हा चिंतेचा विषय असून आधुनिकतेबरोबरच शेतकऱ्यांनी गोधन सांभाळणे गरजेचे आहे.