नांदेड : बोगस आदिवासी जात प्रमाणपत्र घोटाळा उघड झालाय. कोलम आदिवासींच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बोगस आदिवासी जात प्रमाणपत्र घोटाळ्यात रोज नवनवे खुलासे पुढे येतायत. एकट्या नांदेड जिल्ह्यात गेल्या ५० वर्षांत कोलम या आदिवासी जमातीच्या लोकसंख्येमध्ये थोडी-थोडकी नव्हे, तब्बल साडेपाचशे पट वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
या प्रकरणी तीन वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमल्या गेल्यात. SIT, पोलीस आणि किनवटचे विभागीय दंडाधिकारी या प्रकरणाची चौकशी करतायत. १९७१ च्या जनगणनेमध्ये कोलम समाजाची नांदेडमधली लोकसंख्या केवळ ३ हजार ६०० होती. मात्र १९९१च्या जनगणनेतमध्ये ती ५० हजार झालीये.
विशेष म्हणजे ठाणे, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोलम आदिवासींच्या लोकसंख्येमध्ये या काळात घट झालीये. बोगस प्रमाणपत्रांशिवाय इतकी वाढ कशी शक्य आहे, हा प्रश्नच आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱे किनवटचे विभागीय दंडाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनीही या लोकसंख्या वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.