गुप्तधनाच्या लालसेतून कासवांची तस्करी, दोघांना अटक

गुप्तधनाच्या लालसेतून शंभर कासवांची तस्करी झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघड झाला आहे. छोट्या पिशव्यांमध्ये भरून या कासवांची तस्करी रेल्वे गाड्यांचा माध्यमातून सुरु होती. 

Updated: Jun 2, 2015, 01:09 PM IST
गुप्तधनाच्या लालसेतून कासवांची तस्करी, दोघांना अटक title=

नागपूर: गुप्तधनाच्या लालसेतून शंभर कासवांची तस्करी झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघड झाला आहे. छोट्या पिशव्यांमध्ये भरून या कासवांची तस्करी रेल्वे गाड्यांचा माध्यमातून सुरु होती. 

उत्तर प्रदेशातल्या झाशी मधून या कासवांना दोघे जण आंध्र प्रदेशात नेत होते. मात्र रेल्वे पोलिसांनी संशयावरुन या दोघांची झडती घेतली, तेव्हा हा प्रकार उघड झाला. दरम्यान छोट्या पिशव्यांमध्ये कासवांना कोंबू्न ठेवल्यामुळं, अनेक कासवांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. 

चंदाबाबू आणि शिवकुमार अशी या तस्करांची नावं आहेत. या दोघांकडूनही 100 कासवांना हस्तगत करण्यात आली आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.