शशिकांत पाटील, लातूर : लातूर शहरापासून जवळ असलेल्या १२ नं. पाटीजवळ दोन ट्रॅव्हल्समध्ये टक्कर होवून आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात २ जण ठार तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत.
लातूर-बार्शी या राज्य महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या राजधानी ट्रॅव्हल्स आणि मिनी ट्रॅव्हल्स मध्ये हा अपघात झाला. गणेश बेकरीमधील कामगार मिनी ट्रॅव्हल्समध्ये होते. यातील दोन कामगारांचा या अपघातात रुग्णालयात मृत्यू झाला. तर यातील आणखी ०३ जणांची प्रकृती गंभीर आहे.
उर्वरित ३० ते ३५ जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात आणि काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.