राज्यमंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला दे धक्का, सेनेकडून उमेदवार

रत्नागिरीचे आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सामंत हे  उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करतील. 

Updated: Sep 26, 2014, 05:49 PM IST
राज्यमंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला दे धक्का, सेनेकडून उमेदवार title=

रत्नागिरी : रत्नागिरीचे आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदय सामंत हे  उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करतील. 

रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्यात कमालीचे वितुष्ठ होते. त्यामुळे त्यांच्यात अनेकवेळा शाब्दीक चकमक उडाली होती. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ते नाराज होते. त्यांची नाराजी पक्षाने दूर केली होती. त्यांना युवकचे प्रदेश अध्यक्षपद आणि वर्षभरापूर्वी प्रथमच राज्यमंत्रीपद दिले होते. 
 
रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून भाजपचे बाळ माने हे उमेदवार होते. ते आज अर्ज दाखल करणार होते. मात्र, कालच भाजप-सेनेची युती तुटली. त्यामुळे भाजप-सेने स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले. उदय सामंत यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून येणे अवघड होते, असे बोलले जात होते. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेला मानणारा वर्ग जास्त आहे. त्यामुळे सामंत यांनी मागील काही दिवसापासून शिवसेनेशी संपर्क वाढविला होता. 

मागील आठवड्यातही सामंत शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांनी त्याचे खंडन केले होते. दरम्यान, उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.