सातारा : अजित पवारांकडे पक्षाची जबाबदारी दिल्यामुळंच राष्ट्रवादीची पिछेहाट झालीय, असा घरचा अहेर दिलाय राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी...
नुकतीच, 'खासदार उदयनराजे आणि रामराजे यांनी पोरकटपणा थांबवावा' अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यालाच, खासदार उदयनराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्रात पक्षाची जबाबदारी अजित पवारांकडे देऊ नये, अशी विनंतीही आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी काही आपलं ऐकलं नाही... आणि म्हणूनच आज पक्षाची अशी दयनीय अवस्था झालीय, असंही यावेळी उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.