नाशिक : मनसेच्या वसंत गीतेंना खेचण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची चढाओढ दिसून येत आहे.
माजी आमदार वसंत गीते यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला असला तरी त्या मागे मोठे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजप नेतेही गीतेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
विधानसभेतील मनसेचा दारुण पराभव आणि स्वत:च्या पराभवाने गीते नाराज आहेत. शिवाय त्यांनी कालच मनसेच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळेच शिवसेनेचे नेते वसंत गीते यांना आपल्या पक्षात येण्यासाठी फिल्डींग लावली आहे. त्याचवेळी आज भाजपनेही मोर्चेबांधणी सुरु केली.
दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील मनसेचे काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त होतं. मात्र मनसेच्या नगरसेवकांनी या वृत्ताचा इन्कार केलाय. सर्व नगरसेवक मनसेसोबतच राहाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर वसंत गीते यांच्या नाराजीचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
नाशिकमध्ये वसंत गीते यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांना पक्षात घेऊन आपला पक्ष वाढविण्यासाठी शिवसेना आणि भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे गिते मनसेत राहतात की शिवसेना की भाजपच्या गळाला लागतात, याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.