व्हिडिओ : एकनाथ शिंदेच्या मुलाचा प्री-वेडिंग व्हिडिओ

शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा विवाह समारंभ ठाणेकरांसाठी उत्सुकतेचा आणि आश्चर्याचा विषय ठरलाय. 

Updated: Nov 19, 2016, 09:17 AM IST
व्हिडिओ : एकनाथ शिंदेच्या मुलाचा प्री-वेडिंग व्हिडिओ title=

मुंबई : शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा विवाह समारंभ ठाणेकरांसाठी उत्सुकतेचा आणि आश्चर्याचा विषय ठरलाय. 

एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदारदेखील आहेत. ठाण्यातल्या कॅडबरी जंक्शन भागातील रेमण्ड फॅक्टरीच्या पटांगणात त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

सामान्य नागरिक पैशांसाठी बँकांसमोर रांगा लावत असतानाच शिंदे यांच्या मुलाच्या लग्नावर करण्यात आलेला खर्च आणि डामडौल हा अनेकांसाठी धक्कादायक होता.

श्रीकांत शिंदे यांचं प्री - वेडिंग फोटोशूट आणि व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.