ठाण्यात मॉलच्या शौचालयात महिलांचं मोबाईल चित्रीकरण

ठाण्यात मॉलमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईलनं चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र, मॉल व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे भामटा पसार  झाला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 

Updated: Jun 13, 2015, 11:07 PM IST
ठाण्यात मॉलच्या शौचालयात महिलांचं मोबाईल चित्रीकरण title=

ठाणे : ठाण्यात मॉलमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईलनं चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र, मॉल व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे भामटा पसार  झाला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 

कापुरबावडी नाक्याजवळील प्रख्यात व्हिव्हियाना मॉलमधील रेस्टॉरन्टमध्ये ३५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसमवेत जेवण करण्यासाठी गेली होती. स्वच्छतागृहात गेली असताना महिलेला वरच्या बाजूला
हात आणि मोबाईल दिसला. 

याबाबत मॉल व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यावर स्वच्छतागृहाची तपासणी करण्यासाठी सगळ्यांनी धाव
घेतली. तेव्हा स्वच्छतागृह आतून बंद आढळले. नंतर काही वेळाने आतील संशयास्पद व्यक्तिने संधी साधुन धूम ठोकली. 

मॉल व्यवस्थापनाने तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली असती तर, हा भामटा सापडला असता. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये एक व्यक्ती पळताना दिसत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.