कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने आता तीन दिवस पाणी कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावलं आहे.

Updated: Mar 12, 2016, 05:48 PM IST
कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट title=

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने आता तीन दिवस पाणी कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावलं आहे.

बारवी धरणानं तळ गाठल्यानं महाराष्ट्र शासनाच्या ठाणे पाटबंधारे विभागानं पाणीकपात वाढवली आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत उपलब्ध पाणी पुरावे यासाठी पाणीकपातीत वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.