मराठवाड्याला नगर, नाशिक जिह्यातून पाणी मिळण्यास सुरूवात

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत मराठवाड्यानं नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायलयानं महामंडळाच्या आदशावर शिक्का मोर्तब केल्यानंतर काल रात्री १० वाजता नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Nov 2, 2015, 10:03 AM IST
मराठवाड्याला नगर, नाशिक जिह्यातून पाणी मिळण्यास सुरूवात title=

अहमदनगर/नाशिक: समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत मराठवाड्यानं नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायलयानं महामंडळाच्या आदशावर शिक्का मोर्तब केल्यानंतर काल रात्री १० वाजता नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. 

आणखी वाचा - पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघर्ष पेटणार

पाटबंधारे विभागाच्या वतीन अचानक निर्णय घेऊन पाणी सोडण्यात आले असून आता हे पाणी जायकवाडीच्या दिशेन निघालंय. तर दुसरीकडे मराठवाड्याला पाणी देण्यासाठी नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली एकूण २००० कुसेक्स पाणी दोघा धरणातून सुरु करण्यात आलं. 

आणखी वाचा - 'शेतकरी मित्रांनो, मला आत्महत्या करण्यापूर्वी एक फोन करा'

असं असताना गंगापूर धरणावर नाशिकच्या सर्वपक्षीय लोक प्रतिनिधींनी सोडलेलं पाणी बंद केलं. शेकडो शेतकरी यावेळी धरणावर उपस्थित होते. अखेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात धरणाखाली करुन घेण्यात येऊन पुन्हा मध्यरात्री पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.