पुणे : नव वर्षाच्या पार्ट्यांमधून करणूक कर विभाग देखील मालामाल होणार आहे. पुण्यात कामणूक कर विभागाला नव वर्षाच्या पार्ट्यामधून आतापर्यंत ३५ लाखांचं उत्पन्न मिळालं आहे.
आज हा आकडा दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नव वर्षाच्या पार्ट्यांसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात आतापर्यंत ८० पार्टी आयोजकांनी करमणूक कर विभागाची परवानगी घेतली आहे.
नव वर्षाच्या पार्टी मध्ये करमणुकीचे कार्यक्रम ठेवले आणि त्याला तिकीट लावले तर, आयोजकांना त्यावर कर भरावा लागतो. करमणूक कर बुडवून पार्टी आयोजित करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी २२ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार , नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली ही भरारी पथकं काम करतील. ३१ डिसेंबरच्या रात्री ही भरारी पथकं न्यू इअर पार्ट्यांमध्ये जाऊन तपासणी करणार आहेत.