आक्षेपार्ह कमेंट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये

 मज्जा, मस्ती, मस्करी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा ग्रुप केला जातो. त्यात व्हॉट्सअॅपच्या अॅडमिनवर अनेक जोक्स करून त्याची सदस्यांकडून टिंगलटवाळी केली जाते, पण सदस्यांनी तक्रार करून थेट ग्रुप अॅडमिनला तुरूंगात टाकण्याची घटना नागपुरात घडली आहे. आक्षेपार्ह कमेंट टाकल्या प्रकरणी नागपूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या ग्रुप अॅडमिन राकेश ठाकूरला ग्रुपमधल्या सदस्यांनी खरंच तुरूंगात टाकलं आहे. .

Updated: Jun 24, 2015, 09:27 PM IST
आक्षेपार्ह कमेंट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये title=

नागपूर :  मज्जा, मस्ती, मस्करी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा ग्रुप केला जातो. त्यात व्हॉट्सअॅपच्या अॅडमिनवर अनेक जोक्स करून त्याची सदस्यांकडून टिंगलटवाळी केली जाते, पण सदस्यांनी तक्रार करून थेट ग्रुप अॅडमिनला तुरूंगात टाकण्याची घटना नागपुरात घडली आहे. आक्षेपार्ह कमेंट टाकल्या प्रकरणी नागपूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या ग्रुप अॅडमिन राकेश ठाकूरला ग्रुपमधल्या सदस्यांनी खरंच तुरूंगात टाकलं आहे. .

 
फोटो, मेसेज, जोक्स असे अनेक प्रकार व्हॉट्सअॅपवर होत असत पण एके दिवशी राकेशने टाकलेल्या एका आक्षेपार्ह कमेंटमुळे ग्रुपमध्ये तणावाचे वातावरण झाले आणि थेट गोष्ट गेली पोलीस चौकीपर्यंत. ग्रुपमधील बहुतांशी सदस्यांनी राकेशच्या त्या कमेंट ला विरोधही दर्शविला.
 
राकेश ऐकत नाही म्हणून ग्रुप मधील सर्व सदस्य हुडकेश्वर पोलिस स्टेशन गाठले गेले. राकेश सक्करदरा परिसरातील रहिवाशी असल्यामुळे वाद सक्करदरा पोलिस स्टेशनला पोहोचला. 

पोलिसांनी ग्रुपमधील सर्व सदस्यांना समोरासमोर बसवून वाद सोडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, काही ही केल्या ग्रुप एडमिन राकेश झुकायला तयार नव्हता. अखेर पोलिसांनी कलम 295 अंतर्गत भावना दुखावल्या प्रकरणी त्याला अटक केली.

त्यामुळे आता कोणतीही कमेंट करण्यापूर्वी एकदा विचार करा, नाही तुरुंगाची हवा खावी लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.