म्हणून शरद पवार 'पिल्लू' सोडतात - खडसे

"पाण्याशिवाय मासा कसा असतो, तशी अवस्था किंवा तशी स्थिती सध्या शरद पवारांची आहे,  म्हणून अधून-मधून ते मध्यवर्ती निवडणुकांचं राजकारणात 'पिल्लू' सोडून देतात, मात्र सध्या राज्यात मध्यावधी निवडणुकांची स्थिती नाही", असं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Updated: Jul 26, 2015, 04:06 PM IST
म्हणून शरद पवार 'पिल्लू' सोडतात - खडसे title=

बारामती : "पाण्याशिवाय मासा कसा असतो, तशी अवस्था किंवा तशी स्थिती सध्या शरद पवारांची आहे,  म्हणून अधून-मधून ते मध्यवर्ती निवडणुकांचं 'पिल्लू' सोडून देतात, मात्र सध्या राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकांची स्थिती नाही", असं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे त्यांच्या आयुष्यात फार कमी वेळा सत्तेबाहेर राहिलेले आहेत, म्हणून पवार राजकीय सत्तेसाठी अस्वस्थ आहेत, असं एकनाथ खडसे यांनी बारामतीत बोलतांना सांगितलं. 

याकूबचा पुळका, ओवेसीला पाकिस्तानात पाठवा : एकनाथ खडसे

जळगाव :  याकूब मेमन हा एक आतंकवादी आहे आणि त्याला शिक्षेपासून वाचविण्यासाठी असदुद्दीन ओवेसी जर वायफळ बडबड करत असेल तर त्याला पाकिस्तानात पाठविण्याची गरज असल्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. 

कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला फाशी झालीच पाहिजे. ओवेसी हे याकूब प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करताहेत. भारतात राहून एखादी व्यक्ती भारतीय न्यायव्यवस्थेचा सन्मान करीत नसेल, पाकिस्तानचे गोडवे गात असेल तर त्याला पाकिस्तानात पाठवा, अशी सडेतोड प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे. 

जळगावातील अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते. ते म्हणाले की, 'याकूब मेमन हा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्याकडे सरकार ‌आणि कोर्ट एक हिंदू ‌किंवा मुसलमान म्हणून पाहत नसून, तो एक आतंकवादी आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.