पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर येत्या पावसाळ्यात पुन्हा एकदा दोन लेन बंद ठेवण्याचा विचार एमएसआरडीसीनं सुरू केलाय.
पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर मान्सूनच्या काळात बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळण्याचं प्रमाण जास्त असंतं. त्यामुळे या भागात पुन्हा एकदा नव्यानं बोल्टिंग करण्याचा विचार एमएसआरडीसीनं सुरू केलाय.
बोल्टिंगच्या तंत्रज्ञान आयआयटी मुंबईकडून विकसित करण्यात आलंय. गेल्या दोन वर्षात पावसाळ्यामध्ये दरडी कोसळल्यानं, काहींचा बळीही गेला होता. त्यापार्श्वभूमीवर बोल्टिंग करून दरडी कोसळण्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच पुढचा भाग यंदा हाती घेण्याचा विचार एमएसआरडीसीनं सुरू केलाय.