भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय

मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Updated: Jul 17, 2016, 08:48 PM IST
भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय title=

अमोल पाटील, खोपोली  : मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

डोंगरावरुन कोसळणारा हा फेसाळणारा धबधबा. आजूबाजूला निसर्गानं मुक्तपणे उधळण केलेली हिरवाई. हे सारं काही कुणालाही मोहून टाकणारं. त्यामुळेच की काय पावसाळा सुरु होताच कुणाचीही पावलं आपसुकच या परिसराकडे वळतात.. पर्यटकांना प्रेमात पाडणारा हा आहे रायगडच्या खोपोलीचा झेनिथ धबधबा.

या धबधब्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी आणि सृष्टी सौदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी विकेंडला तर इथं पर्यटकांची झुंबड उडते.. पर्यटक सामान्य असो किंवा मग एखादा सेलिब्रिटी हा झेनिथ धबधबा प्रत्येकावर मोहिनी घालतो.

राज्यभर प्रसिद्ध असलेला हा धबधबा गेल्या काही वर्षात अपघातांमुळं चर्चेत आलाय.. पर्यटक वाहून जाणे आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळं हा धबधबा असुरक्षित झाला. या ठिकाणी कोणत्याही सुविधा देण्यात येत नसल्यानं पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काहीही असलं तरी पर्यटक विकेंडला झेनिथ धबधब्यावर मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. धम्माल मस्ती करतात. मात्र धबधब्याचे तुषार अंगावर झेलताना प्रेक्षकहो कुठे अपघात होणार नाही ना याची काळजी मात्र जरुर घ्या.