समद्या गावाला झालीया संडास बांधण्याची घाई!

सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे विक्रम मोडून काढले. सैराट चित्रपटाच्या गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली.

Updated: Aug 5, 2016, 08:27 PM IST
समद्या गावाला झालीया संडास बांधण्याची घाई!

वाशिम : सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे विक्रम मोडून काढले. सैराट चित्रपटाच्या गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. सैराट चित्रपटांच्या गाण्याचा आता गावांमध्ये शौचालयं बांधण्यासाठीच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात येत आहे. 

झिंगाट गाण्याच्या चालीवर 'समद्या गावाला झालीया संडास बांधण्याची घाई' हे गाण बनवून जनजागृती केली जात आहे. लोककलावंत सुशिलाबाई घुगे यांच्या आवाजात हे गाण म्हणण्यात आलं आहे. शौचालय नसणाऱ्या घरासमोर हे कलावंत हे गाणं म्हणून शौचालय बांधण्याचं आवाहन करतात. 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कासोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी स्वच्छता दिंडी काढली. या दिंडीमध्ये या गाण्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 

पाहा शौचालय बांधण्यासाठीचं हे 'झिंगाट' गाणं