मुंबईत स्टार प्रचारकांची मांदियाळी

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे.

Updated: Jan 14, 2012, 04:26 PM IST

www.24taas.com

 

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय.

 

तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे. याआधी मनसेने बाजी मारत राज ठाकरे यांच्या 'होम मिनिस्टर' शर्मिला ठाकरे यांना उतरविले आहे. खुद मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही मैदान मारतात. याआधीचा अनुभव आहे. मात्र, मनसेच्या भूमिकेनंतर सेनेही आघाडी घेण्यासाठी व्युह रचना केलीय.

 

 

मनसे भूमिकेच्या (शर्मिला ठाकरे यांना उतरविले ) दुसऱ्या दिवशी शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुंबई आणि ठाण्यात दोन सभा घेतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या सभांकडे लक्ष असणार आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी लक्षात घेता किती प्रमाणात मतांमध्ये परिवर्तन होईल, याचीच उत्सुकता अधिक आहे.

 

आता तर भाजप, ऱाष्ट्रवादीने प्रचारासाठी उडी मारली आहे. मुंबईत गुजराती मतदारांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा प्रचार मुंबईत भाजपला मोठा फायदा करून देऊ शकतो. मुंबईतल्या अनेक वॉर्डांमध्येदेखील भाजपकडून गुजराती उमेदवार उभे आहेत. त्यांची ताकदही मोदींच्या आगमनानं वाढू शकते. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी युतीच्या व्यासपीठावरून प्रचार करताना दिसले होते.

 

आता मात्र ते केवळ भाजपच्याच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे स्टार प्रचारक असतील, अशी घोषणा शिवसेनेनं अगोदरच केलीय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराची धुरा राज्य पातळीवरील नेत्यांकडे सोपविण्याची परपंरा असतानाही महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार स्वतः मैदानात उतरणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मिळत आहेत.

 

तसेच गेल्या पंधरा वर्षांपासून विरोधकांच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका  आपल्या ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरसावले आहेत. मुंबईतील प्रचारासाठी सोनिया गांधींना निमंत्रण देण्याच्या हालचालीही कॉंग्रेसमधून सुरू झाल्याने सोनिया गांधी  आणि शरद पवार यांची मुंबईत एकत्र सभा होण्याची शक्‍यता दोन्ही कॉंग्रेसमधून वर्तविण्यात येत आहे. याचबरोबर युवा नेतृत्व राहुल गांधींनाही मुंबईत आणण्यासाठी  धडपड सुरू आहे. त्यामुळे निवडणुक प्रतारात अधिकच रंगत येणार आहे.

 

याआधीच्या नगरपालिका निवडणुकांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सहभाग घेतला नव्हता. परंतु महापालिकांच्या निवडणूक प्रचारात ते स्वतः उतरतील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सांगण्यात आले. मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक येथे शरद पवार यांच्या सभा होतील, त्या दृष्टीने प्रचाराचा कार्यक्रम ठरविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे वृत्त