शिवसेनाप्रमुख टोचणार शिवसैनिकांचे कान

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. आज संध्याकाळी मुंबईतल्या शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी शिवसेनाप्रमुख संवाद साधणार आहेत.

Updated: Jan 19, 2012, 11:37 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. आज संध्याकाळी मुंबईतल्या शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी शिवसेनाप्रमुख संवाद साधणार आहेत.

 

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुखांनी मार्गदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज संध्याकाळी साडेसात वाजता रंगशारदा सभागृहात ही बैठक होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेची निवडणुकीची रणनीती, शिवसेनेपुढील आव्हानं या विषयावर शिवसेनाप्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. ठिकठिकाणी कार्यरत असलेले शाखाप्रमुख हे शिवसेनेतील महत्त्वाचे पद आहे, त्यांच्याशी संवाद साधून मुंबई महापालिका निवडणुकीचा खुंटा बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

 

या कार्यक्रमात ५ शिवसेना गीतांच्या सीडीचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. याचबरोबर शिवसेनाप्रमुखांच्या दोन सभाही या निवडणूक काळात होणार असून, मुंबईत १३ फेब्रुवारीला एमएमआरडीए मैदानावर तर दुसरी ठाण्यात ११ फेब्रुवारीला सेंट्रल मैदानावर होणार आहे. पूर्व उपनगरातही तिसरी सभा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.