सिद्धिविनायक मंदिर २० जानेवारीपासून बंद

मुंबईचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धिविनायक मंदिर येत्या २० जानेवारी - २५ जानेवारी दरम्यान भाविकांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन या काळात घेता येणार नाही.

Updated: Jan 18, 2016, 06:58 PM IST
सिद्धिविनायक मंदिर २० जानेवारीपासून बंद title=

मुंबई : मुंबईचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धिविनायक मंदिर येत्या २० जानेवारी - २५ जानेवारी दरम्यान भाविकांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन या काळात घेता येणार नाही.

२० ते २४ जानेवारी या काळात मूर्तीला शेंदूर लेपनाचं काम केलं जाईल. त्यामुळे बाप्पाला भेटणं भाविकांना शक्य होणार नाही. 

दररोज हजारो लोक सिद्धीविनायकायाच्या दर्शनाला येत असतात. मंगळवारी तर ही संख्या लाखोंच्या घरात जाते. 

जरी मंदिर पाच दिवस बंद राहणार असले तरी भाविकांना प्रतीमूर्तीचं दर्शन घेण्याची सोय मंदिर प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे. २५ जानेवारीला दुपारी १ वाजता पूजा आणि आरती झाल्यावर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुलं केलं जाईल.