ठाणे महापालिका निकाल १७ फेब्रुवारीलाच

ठाणे मनपाची मतमोजणीही १७ फेब्रुवारीलाच होणार आहे. ठाण्याचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीच मतमोजणी करण्यासाठी ठाणे मनपा प्रयत्नशील होती.

Updated: Feb 6, 2012, 09:42 PM IST

www.24taas.com, ठाणे

[caption id="attachment_42865" align="alignright" width="250" caption="ठाणे महानगरपालिका"][/caption]

महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हा विषय फारच चर्चेचा ठरला. मात्र मुंबई आणि इतर महापालिका यांचा निकाल हा देखील १७ फेब्रुवारीलाच येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. मात्र ठाणे महानगरपालिकेबाबत निर्णय निवडणूक आयोगाने बाकी ठेवला होता. मात्र निवडणूक आयोगाने आज ठाणे महानगरपालिका मतमोजणी बाबत हे देखील जाहीर केले.

ठाणे मनपाची मतमोजणीही १७ फेब्रुवारीलाच होणार आहे. ठाण्याचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीच मतमोजणी करण्यासाठी ठाणे मनपा प्रयत्नशील होती.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं मतदानानंतर लगेचच काही तासात निकाल लागणार होता. मात्र अन्य मनपांत १७ फेब्रुवारीलाच मतमोजणी होणार असल्यानं, कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळं १७ फेब्रुवारीला मतमोजणी करण्याचा निर्णय घेतल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केला आहे.