मनपाचे लॅपटॉप नगरसेवकांकडेच!

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊनही नगरसेवकांनी त्यांना दिलेले लॅपटॉप परत केलेले नाहीत. फक्त २२७ पैकी दोन नगरसेवकांनी लॅपटॉप परत केलेत.

Updated: Jan 18, 2012, 10:12 AM IST

हेमंत बिर्जे, www.24taas.com,मुंबई

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊनही नगरसेवकांनी त्यांना दिलेले लॅपटॉप परत केलेले नाहीत. फक्त २२७ पैकी दोन नगरसेवकांनी लॅपटॉप परत केलेत.

महापालिकेच्या नगरसेवकांनी हायटेक पद्धतीनं मुंबईकरांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी महापालिकेनं त्यांना लॅपटॉप दिले होते. त्यासाठी पालिकेनं ११ कोटी ६० लाख रुपये खर्च केले होते. महापालिकेची निवडणुक जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांनी  लॅपटॉप परत करणं गरजेचं होतं. मात्र २२७ पैकी फक्त दोन नगरसवेकांनी लॅपटॉप परत केलेत.

काँग्रेस नगरसेवक विनोद शेखर आणि अब्दूल अजिज बारदूगर या दोन्ही नगरसेवकांनी लॅपटॉप रिटर्न करून नगरसेवकांत आदर्श निर्माण केला आहे. लॅपटॉप रिटर्न करण्यास टाळाटाळ नगरसेवकावर पालिका कारवाई करणार का ? याकडं मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.